नवी मुंबई

नवी मुंबईतील माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांची आत्महत्या.

नवी मुंबई, ता १९, (संतोष पडवळ ) : दिघा येथील माजी नगरसेवक भोलानाथ महादशेठ ठाकूर यांनी आपल्या राहत्या गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज नवी मुंबईमध्ये घडली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. १ चे ते माजी नगरसेवक होते. भोलानाथ ठाकूर हे दिघ्यामधील आनंदनगर येथे वास्तव्यास होते. नाईक समर्थक गणले जाणारे भोलानाथ ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. परंतु त्यांच्या आत्महत्ये मुळे संपूर्ण नवी मुंबईकरांना धक्का बसला असून दिघा विभागात शोककळा पसरली आहे.

सदर घटणास्थानळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून अधिक तपास सुरु असल्याचे समजते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!