मुंबई

इंधन दरवाढीचा फटका ; मुंबई एमएमआर रिजनमध्ये रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ.

 मुंबई, ता 22, संतोष पडवळ : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने लोकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुंबई एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढत पेट्रोल-डिजेलच्या वाढलेल्या किमतींमुळे संकटात वाढ होण्याचं चित्र आहे. परिणामी मुंबई एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचं भाडं 18 वरुन 21 रुपयांवर होणार असण्याची माहिती समोर आली आहे. तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आज परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेट्रोल, डिजेलच्या किंमतीत वाढ होत आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेला याचा फटका बसत आहे. या इंधन वाढीच्या निर्णयावर रिक्षा व टॅक्सी चालकांकडून आंदोलन पुकारण्यात येणार होते. मात्र आता भाड्यात वाढ करुन दिल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांना या फटका सहन करावा लागणार आहे.
आधीच कोरोनाचं संकट त्यात पेट्रोल-डिजेल भाडेवाढीबरोबरच रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे वाढ केल्याने सर्वसामान्यांचा खिशाला फटका सहन करावा लागणार आहे.

दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडतात की काय अशा वेगाने वाढत आहेत.  अनेक शहरांत पेट्रोल शंभरीला पोहोचलं आहे. एका बाजूला इंधनाच्या वाढत्या किमतींवरून विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत असताना कच्च्या तेलाचे दर का वाढत आहेत याचं स्पष्टीकरण मोदी सरकार द्यायचा प्रयत्न करत आहे. यावर थोडा दिसाला म्हणून काही राज्यांनी करात घट करत पेट्रोलचे भाव काही प्रमाणात आटोक्यात ठेवायचा प्रयत्न सुरू केला आहे. पण हे भाग्य ज्या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यांच्याच नशिबी आलं आहे. महाराष्ट्रात मात्र तसं चित्र दिसत नाही. पेट्रोलचा भाव सर्वाधिक असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!