ठाणे : ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे निधन. मागील दोन महिने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु सोमवारी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोळी समाजाचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार अनंत तरे यांचे निधन
4 days ago
254 Views
1 Min Read

-
Share This!