ठाणे

ठाणे महापालिकेची धडक कारवाई दोन दिवसात 1 लाख 52 हजार 500 रुपये दंड वसूल मास्क न वापरणाऱ्यां 305 जणांवर कारवाई.

ठाणे (ता २२, संतोष पडवळ ) कोविड १९ चा वाढता संसर्ग लक्षात घेवून संभाव्य संकट टाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सींग नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेवून मास्कचा वापर न करणाऱ्या 305 नागरिकांकडून दोन दिवसात तब्बल 1 लाख 52 हजार, 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सींगचे नियम मोडणाऱ्यांवर कडक करवाई करण्यात येणार असून दंड वसूल करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय पथक तयार करण्यात आले असून दररोज मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

दिनांक 20 फेब्रुवारी 2021 आणि दिनांक 21 फेब्रुवारी 2021 या दोन दिवसात मास्कचा वापर न करणाऱ्या 305 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 13,000, कळवा,16,500,उथळसर प्रभाग समिती 12,000, माजीवडा प्रभाग समिती 18,500 , वर्तकनगर प्रभाग समिती 11,500, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती 14,000, नौपाडा कोपरी 43,500, वागळे प्रभाग समिती 12,000, तर दिवा प्रभाग समिती 11,500 असा एकूण 1 लाख, 52 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!