सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणाऱ्याकडून १० हजार रु. दंड
डोंबिवली ( शंकर जाधव ) : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर डोंबिवलीतील पालिकेच्या `फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत गेल्या तीन दिवसात ३१,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणाऱ्याकडून १० हजार रुपये दंड वसूल झाला असल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.फडके रोड, नेहरू मैदान, मानपाडा रोड प्रामुख्याने या भागात करवाई करण्यात आली.
कोरोन रुग्ण संख्या कमी होऊन लागल्यावर तोंडावर मास्क लावण्याबाबत नागरीक दक्ष नव्हते.कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पाश्वर्भूमीवर पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर करवाईचे आदेश दिले आहे.त्याप्रमाणे शनिवार,रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवसी करवाई करून दंड आकरण्यात आला आहे.लोक अजूनही मानसिकता अजूनही मास्क न लावण्याचे आणि पालिका कर्मचारी आणि पोलीसांवर वाद घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी सावंत यांनी दिली.ज्यांच्याकडे मास्क नसेल अश्यांना पालिकेकडून मास्कचे वाटप ककरण्यात येत आहे.उपहारगृहे,मंगल कार्यालये, उद्याने,खाजगी अस्थापना अश्या सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.
कोरोना विषयी प्रतीबंधात्मक नियमाचे उल्लघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे.तर शनिवारी `ग`प्रभाग क्षेत्र हद्दीत विविध अश्या विविध खाजगी अस्थापनांवर कारवाई करण्यात आली. विनामास्क ८ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर रविवारी १२ विविध आस्थापनांचवर कारवाई करण्यात आली. तर विनामास्क ६ नागरिकांवर ३ हजार रुपये अशी दंडात्मक वसुली केल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी दिली.
१ ) ८ मंगल कार्यालये,९ सार्वजिनिक ठिकाणे, ८० खाजगी अस्थापना,विनामास्क १०८ नागरीक, ५४ सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणारे नागरीक असा ३१, ५०० रुपये अशी पालिका प्रशासनाने दंड वसुली केली.
२ ) शिवसेनेच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार रद्द..
शिवसेनेच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या २७ तारखेला कोरोना योद्धांचा जाहीर सत्कार करण्यात येणार होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राजकीय आणिधार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आल्याने सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.