गुन्हे वृत्त

कॉग्रेसच्या माजी पदाधिकारी शमीम बानो यांनी मुद्रा लोनचे आमिष दाखवून अनेक महिलांना घातला गंडा


डोंबिवली ( शंकर जाधव )
: मुद्रा लोन मिळवून देते असे आमिष दाखवून काँग्रेसच्या माजी पदाधिकारी शमीन बानोने  अनेक महिलांना गंडा घातला. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी  शमीम बानोच्या ताब्यात घेतले आहे. फसवणूक झालेल्या महिलांची मागणी पैसे लवकरात लवकर मिळावेत. त्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी मागणी महिलांनी केली.कल्याणमध्ये राहणारी शमीम बानो नावाची एक महिला ही स्टॅम्प वेंडरचा काम करते. या कामाच्या निमित्ताने अनेक महिला तिच्या संपर्कात आल्या असता तिने अनेकांना विविध प्रकारे गंडा घातला आहे.

विशेष म्हणजे शमीमने अनेकांना मुद्रा लोन मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. शमीमने अनेकांकडून पैसे उकळले आहेत. लोन मिळाले नाही. सर्व महिला तिला विचारपूस करीत होत्या. शमीम बानोने उलट सुलट उत्तरे देण्यास सुरूवात केली. यावेळी संतप्त महिलाना शमीमला चांगलाच चोप दिला. तिला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल असे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण बनकर यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!