महाराष्ट्र

वृत्तपत्र विक्रेत्यांना लवकरच मिळणार शासकीय योजनाचा लाभ

दिल्ली : आज सकाळी श्रम शक्ती भवन दिल्ली येथे केंद्रीय श्रममंत्री श्री संतोष गंगवार यांच्याबरोबर ऑल इंडिया न्यूज पेपर डीस्ट्रीब्यूटर असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक झाली.त्या बैठकीत राष्ट्रीय सल्लागार आमदार श्री संजय केळकर, चेअरमन संजीव केरनी, अध्यक्ष बब्बरसिंग चौहान, दत्ता घाडगे, मुनिष अहमद,आतीफ खान, पिंटू रावल या प्रतिनिधी मंडळात सामील होते.

जवळजवळ एक तास वृत्तपत्र विक्रेत्यांना काय काय योजनांचा लाभ घेता येईल यावर चर्चा करण्यात आली. देश स्वतंत्र होण्यासाठी क्रतीकारी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या विक्रेत्यांनी वृत्तपत्रं घरोघरी पोहचवून केले होते आणि आत्ताही करत आहेत,मात्र शासनाकडून यांना कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाहीत हा मुद्दा कामगार मंत्री यांच्या समोर मांडला. केंद्रशासनाने 15 ऑक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून अधिकृत जाहीर करावा अशीही मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ज्याप्रमाणे सरकारकडून सुविधा मिळनार आहेत त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा अधिनियमांतर्गत सर्व योजनांचा लाभ मिळावा व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या साठी राष्ट्रीय पातळीवर किंवा प्रत्येक राज्यात एक वेगळे कल्याणकारी महामंडळ बनविले पाहिजे अशी मागणी या प्रतिनिधी मंडळाकडून केली गेली. सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी शासनाकडून करून घेऊन या सर्व योजनांचा फायदा देशभरातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळवा अशी मागणी केली गेली.

केंद्रीय श्रम मंत्री यांनी लवकरच देशभरातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगाराप्रमाणे त्यांनाही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देऊ असे आश्वासन या ऑल इंडिया न्यूज पेपर डीस्त्रीबिटर्स असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाला दीले. शिवाय लवकरच फक्त वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी काय काय योजनांचा लाभ देता येईल आणि या योजना कशा प्रकारे कार्यान्वित करता येईल याबद्दल लवकरच एक सविस्तर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल व या बैठकीला ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीबिटर्स असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाला सुद्धा बोलावण्यात येईल असे आश्वासन माननीय मंत्री महोदय यांनी दिले.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!