ठाणे

आय.आय.एफ.एल. फायनन्स लिमिटेड” अंबरनाथ शाखेचे उदघाटन

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्याहस्ते शाखेचे उदघाटन

आयआयएफएल फायनन्स लिमिटेड अंबरनाथ शाखेला भेट द्या – विभागप्रमुख संतोष भोसले

अंबरनाथ दि. २४ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  :  आय.आय.एफ.एल फायनान्स लिमिटेड या कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शाखेचा शुभारंभ अंबरनाथमध्ये करण्यात आला. अंबरनाथच्या पश्चिम भागातील वांद्रापाडा परिसरात बुधवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्याहस्ते या शाखेचे उदघाटन करण्यात आलं. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन अंबरनाथमध्ये आता ही नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.

यावेळी आय.आय.एफ.एल. फायनान्स लिमिटेडचे विभागप्रमुख संतोष भोसले यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.              याप्रसंगी माजी नगरसेवक पंकज पाटील, आय.आय.एफ.एल. फायनन्स लिमिटेड अंबरनाथ शाखेचे विभागप्रमुख संतोष भोसले, क्षेत्रप्रमुख चेतन पिंगळे, मार्केटिंग मॅनेजर संतोष साबत, क्षेत्रप्रमुख संजीव चौधरी, शाखाप्रमुख बाळाराम पाटील, कुलदीप झगडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!