ठाणे

दिव्यातील मासळी विक्रेत्यांसाठी सुसज्ज मच्छीमार्केट उभारण्याची गरज – भाजपचे निलेश पाटील यांची मागणी

ठाणे:-दिवा शहरात जागोजागी मासळी विकणाऱ्या पारंपरिक मासळी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र मार्केट उभारा अशी मागणी ठाणे भाजपचे उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी केली आहे.

ठाणे शहर व अन्य भागात महापालिकेने मासळी विक्रेत्यांना योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वतंत्र मार्केट येथील विक्रेत्यांना देण्यात आली आहेत त्याच धर्तीवर दिव्यात अद्याप मासळी मार्केट का निर्माण करण्यात आले नाही असा सवाल निलेश पाटील यांनी केला आहे.दिव्यात सत्ताधारी पक्षाचे आठ नगरसेवक असूनही अद्याप येथील मासळी विक्रेत्यांना हक्काची जागा मिळत नसेल तर हे सत्ताधारी पक्षाचे अपयश आहे असेही पाटील यांनी म्हटले आहे.

दिवा, साबे, दातिवली, आगासन , बेतवडे गावातून अनेक स्थानिक मच्छिमार या ठिकाणी व्यवसाय करत असतात त्यांच्या गरजा लक्षात घेऊन व नागरिकांना देखील सोयीचे होईल याची दक्षता घेऊन दिवा शहरात किमान दोन सुसज्ज मच्छी मार्केट उभारण्यात यावीत अशी मागणी निलेश पाटील यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!