मुंबई

सर्वसामान्यांना फटका ; तीन महिन्यात तब्बल 200 रुपयांनी महागला घरगुती गॅस

मुंबई, ता 25, (संतोष पडवळ) : एलपीजी गॅस महागाईमुळे या महिन्यात आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे. कारण पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने सामान्यांचे एकंदरित महिन्याचे बजेट कोलमडले आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची दिल्लीतील किंमत 794 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

हे नवीन दर 25 फेब्रुवारीपासून अर्थात आजपासून लागू होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात सामान्यांना आणखी फटका सहन करावा लागणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

डिसेंबरपासून 200 रुपयांनी वधारला एलपीजी गॅस
1 डिसेंबरपासून आतापर्यंत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांच्या बजेटवर नक्कीच परिणाम होत आहे. दर 594 रुपयांवरून आज 794 रुपये प्रति सिलेंडर झाले आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!