ठाणे

अंबरनाथमध्ये लहान मुलांच्या धार्मिक ज्ञान स्पर्धा संपन्न

मोमीन युथ फाउंडेशन आणि मियांभाई ग्रुपचा उपक्रम

स्पर्धेतील विजेत्या मुलांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसांचे वाटप

अंबरनाथ दि. २६ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  :  मुस्लिम समाजातील लहान मुलांमध्ये धार्मिक ज्ञान वाढवण्यासाठी त्यांची “धार्मिक ज्ञान स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती, यात लहान मुलांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्या ज्ञानाचा परिचय दिला.           

 अंबरनाथमध्ये अल्पसंख्याक समाजात कार्यरत असलेल्या मोमिन यूथ फाउंडेशन आणि मियांभाई ग्रुप या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिनी मुजक्करा’ स्पर्धेत समाजातील अनेक मुलांनी भाग घेतला. 

       मोमीन यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अकबर अली यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस स्वामीनगर मैदानावर ही ज्ञानवर्धक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  स्पर्धेत भगतसिंग नगर येथील मदरशाचे मौलाना मोहम्मद अमजद अन्सारी आणि स्वामीनगर मशिदीचे मौलाना अब्दुल हाफिज नूरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. 

       यावेळी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नईम शेख, अ‍ॅड. अझहर कुरेशी, सिकंदर कुरेशी, मनसेचे उपशहरप्रमुख एहसामुद्दीन उर्फ बबलू खान, आकाश शिंदे, आसिफ काझी, मुनीर शेख, अफझल, रफीक शेख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या मुलांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. संस्थेच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!