क्रिडा

गौरी जाधव हिची कुस्ती राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

ठाणे : मामा साहेब मोहळ कुस्ती केंद्र, कात्रज, पुणे येथे झालेल्या 21 वर्षाखालील मूली कुस्ती या खेळाची निवड चाचणी पार पडली, या मध्ये ठाणे जिल्ह्याची गौरी जाधव हीची 65 किलो वजनी गटात बेल्लारी कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी  निवड करण्यात आली.  ही स्पर्धा 19 मार्च ते 21 मार्च दरम्यान होणार आहे. या निवड चाचणी साठी राज्यातील  एकूण66 खेळाडूंनी आपला नोंदवला होता.

गौरी ही एस एस टी महाविद्यालय उल्हासनगर येथे द्वितीय वर्ष कला विभागात शिक्षण घेत आहेत गौरी चे प्रशिक्षक वस्ताद विजय काका बराटे , संदीप पठारे, माधुरी घरळ, गौरी ची आई भारती चंद्रकांत जाधव आणि बहिण राष्ट्रीय खेळाडू मनाली जाधव यांनी गौरी जाधव हिला  राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. अत्यंत कठीण परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

एस एस टी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी , उपप्राचार्य श्री जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक श्री राहुल अकुल , श्री पुष्कर पवार या सर्वांनी गौरीचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालिसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!