ठाणे

महिलांना मदतीचा हात

ठाणे दि. 03 :- कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भामुळे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडीतांना तसेच वेश्या व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड १९ च्या लॉकडाऊनमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असल्याने    मा. सर्वोच्च न्यायालयाने Criminal Appeal NO १३५/२०१० या याचिकेवर शरीर विक्री  व्यवसायावर अवलंबुन असलेल्या महिलांना कोविड १९ च्या फंडातुन कोरडे अन्नधान्य व रोख आर्थिक सहाय्य प्रति लाभार्थी रु. ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) व ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त रु. २,५००/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे मात्र) इतके अर्थ सहाय्य थेट लाभ हस्तांतरण (DBT) पध्दतीव्दारे अदा करण्यात यावेत असे निर्देश दिले. या नुसार ठाणे जिल्ह्यातील महिलांना  अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक धनादेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी उपनियंत्रक नरेश वंजारी डॉ.भंडारी , ठाणे जिल्हा महिला व बाल  विकास अधिकरी महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

या साठीचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, महाराष्ट्र राज्य यांचेकडून  जिल्हाधिकारी, ठाणे यांचे बँक खात्यामध्ये रु. ९६,०७,५००/- (अक्षरी रुपये शेहान्नव लाख सात हजार पाचशे मात्र) इतकी रक्कम जमा करण्यात आली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यांचेकडून या व्यवसाय करणाऱ्या १४३९ महिलांचे नावे व त्यांचे बँक खातेबाबची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. १४३९ महिलांच्या बँक खात्यात एकूण रु. ८६,७२,५००/- ( शहाऐंशी लाख बहात्तर हजार पाचशे मात्र) इतकी रक्कम DBT पध्दतीव्दारे वर्ग करण्यात आली असून त्यांना कोरडे अन्नधान्य वाटप करण्यात आलेले आहे. ज्या महिलांकडे बँक खाते नाही, रेशन कार्ड नाही अश्या महिलांचे बँक खाते सुरु करणे, रेशन कार्ड काढणेसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी वारंवार पाठपुरावा करुन जवळपास सर्व महिलांना रेशन कार्ड व बॅक खाते सुरु केले व त्यांचे बँक खातेवर अर्थ सहाय्याची रक्कम वर्ग केली आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन शरीर विक्री  व्यवसाय करणाऱ्या महिलांची यादी गोळा करणे बाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांना सुचना केली. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी ८ स्वयंसेवी संस्थेकडून ५२७ महिलांची यादी प्राप्त करुन घेतली.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे यांनी या व्यवसाय करणाऱ्या व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाकडे नोंदणीकृत असलेल्या १० संस्थांमधील एकूण १४३९ महिलांची यादी प्रमाणित करुन दिली त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी श्री राजु धोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे यांना सदरील महिलांना कोरडे अन्नधान्य उपलब्ध करुन देणे बाबत विनंती केली असता त्यांनी संबंधीत यंत्रणेस कोरडे अन्नधान्य वाटप करण्याबाबत सुचना केल्या तसेच श्री नरेश वंजारी, उप नियंत्रक शिधा वाटप फ परिमंडळ, ठाणे यांनी ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही अश्या महिलांना रेशन कार्ड काढूण देणे बाबत संबंधीत शिधा वाटप अधिकारी यांना सुचना केल्या व त्यांनी ९५२ महिलांना रेशन कार्ड उपलब्ध करुन दिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!