मुंबई

मुंबईत पर्यटन संचालनालयाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबईच्या नरीमन पॅाईंटस्थित नरीमन भवनमध्ये 15 व्या मजल्यावर पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु करण्यात आले आहे.

पर्यटन संचालनालयाला नवीन कार्यालय प्राप्त झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन पर्यटन राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, संचालनालयाचे स्वतंत्र कार्यालय असावे असे गेल्या काही वर्षांपासून शासनाचे प्रयत्न सुरु होते. या नव्या कार्यालयामुळे पर्यटन वृद्धीसाठी राबविले जाणारे धोरण आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल. पर्यटन संचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत राज्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्याचे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले.

प्रारंभी राज्यमंत्री कु.तटकरे यांनी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!