ठाणे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने रीजेन्सी ईस्टेट व परीसरातील सुमारे १५०० रहीवाशांच्या घरात पाईपलाईन द्वारे घरगुती गॅस पुरवठा होणार

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी  नागरीकांना घराघरात पाईप लाईन द्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्याचे वचन  दिले होते, त्यानुसार  डोंबिवली परीसरात अनेक ठिकाणी यापूर्वीच हा पुरवठा चालू करण्यात आला आहे. याचाच  पुढील टप्पा म्हणून वेंकटेश पेट्रोलपंप ते कस्तुरी पार्क, रीजेन्सी, व आजूबाजूच्या परीसरातील नागरीकांसाठी पाईप लाईन टाकण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख  प्रकाश म्हात्रे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी उपतालुका प्रमुख बंडू पाटील, माजी नगरसेविक  प्रमिला पाटील, माजी सरपंच मुकेश पाटील, केशव पाटील,  नकुल गायकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख, रीजेन्सी इस्टेट सोसायटीचे वतीने विलास नरे, सुभाष कापरे, चंद्रहंस चौधरी, वासुदेव हंचाटे, मिलिंद पाटणकर, सखाराम ठाकर, श्रीधर हाल्गीरी रुपेश भट्ट व इतर सदस्य, महानगर गॅस तर्फे चिफ इंजिनीयर प्रमोद राय, असि. इंजिनियर हर्षल पटवर्धन इत्यादी उपस्थित होते.

     काही दिवसांपूर्वी, रीजेन्सी इस्टेट येथील रहीवासी, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील व श्री. मुकेश पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना भेटले व पाईपलाईन द्वारे गॅसचा पुरवठा आजून आमच्या विभागात सुरू झाला नसून यात कृपया लक्ष घालावे अशी विनंती केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तातडीने महानगर गॅसच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर भागात काम तातडीने सुरू करण्याची मागणी करून यासाठी खासदार कार्यालय प्रमुख  प्रफुल्ल देशमुख यांना  पाठपुरावा सुरू करण्यास सांगीतले, त्याचाच परीणाम म्हणून सदर गॅस पाइपलाईन टाकण्याचे काम चालू करण्यात आले. मे महीन्या पर्यंत पहील्या टप्प्यात रहीवाशांना घराघरात गॅस पुरवठा चालू होइल व टप्प्या टप्प्याने परीसरातील सर्वच रहीवाशांच्या घरी म्हणजे सुमारे १५०० रहीवाशांच्या घरात पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा सुरू होइल अशी माहीती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे वतीने खासदार कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख यांनी दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!