ठाणे

`हावश्या`चा वाढदिवस पडला महागात…

बिवली ( शंकर जाधव ) : आपल्या पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे नवीन फॅड आले आहे. मात्र डोंबिवलीत`हावश्या`नावाच्या बैलाचा वाढदिवस साजरा केल्याने बैलाच्या मालकाला चांगलेच महागात पडले आहे.कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध घातले आहे.या नियमांची उल्लंघन करणारे महाभाग असून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे.गुरुवारी ११ तारखेला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास किरण एकनाथ म्हात्रे ( ३१ ) याने डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथे राहत्या घराच्या पाठीमागे काही लोक जमवून तोंडाला मास्क न लावता निष्काळजीपणे स्वतःचा व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल याची जाणीव असताना सुद्धा त्याचा`हावश्या`नावाच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा करताना  ५० पेक्षा जास्त लोक जमा झाली असून एकाच्याही तोंडावर मास्क लावलेले नव्हते.पोलीस आयुक्त ठाणे शहर व कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. किरण एकनाथ म्हात्रे ( ३१ ) याच्या विरोधात भादवी कलम २६९,२७०,१८८ महाराष्ट्र कोविड २०२० चे कमल ११, साथरोग प्रतिबंध अधिनियम कमल ३ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कमल ५१ ( ब ) प्रमाणे विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!