मुंबई

मुंबईत बेस्ट बसला आग ; सतर्कतेमुळे प्रवाशी वाचले.

मुंबई, ता १३, संतोष पडवळ : मुंबईतील भांडुप भागात बेस्टची बस क्रमांक ६०६ ही बस भांडुप (प.), गाढव नाका येथून प्रवाशांना घेऊन जात असताना बस चालकाला बस केबिनमधील रेडिएटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन कग लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बस चालकाने त्वरित सतर्कता दाखवून बसमधील प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्याचबरोबर त्याचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक मदतीला धावले. अखेर या बसला लागलेली आग तात्काळ विझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

प्राप्त माहितीनुसार, बेस्ट परिवहन विभागाची बस क्रमांक ६०६ ही भांडुप (प.) रेल्वे स्थानक ते नरदास नगर अशी मार्गक्रमण करते. सदर बस प्रवाशांना घरून शुक्रवारी सायंकाळी ६.०५ वाजताच्या सुमारास गाढव नाका येथे आली असताना बस चालकास बस केबिनमधील रेडिएटमधून धूर निघत असल्याचे व तिथे आग लागल्याचे निदर्शनास आले. त्याबरोबर त्याने तात्काळ बस थांबवून बसमधील प्रवाशांना सुखरूपपणे बसमधून खाली उतरवले.

तसेच, बस चालक व स्थानिक नागरिकांनी अग्निशामक नळकांडीचा आणि पाण्याचा वापर करुन ही आग विझवली. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. सदर आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. या घटनेनंतर सदर बस विक्रोळी आगारात नेण्यात आली. याप्रकरणी बेस्ट उपक्रमाकडून चौकशी सुरू आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!