ठाणे

डोंबिवली पक्षी अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी श्रमदानातून पाणवठे : डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली ( शंकर जाधव ) : जंगलातील असंख्य पशुपक्ष्यांसाठी असे कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. हे लक्षात आल्यामुळे डोंबिवली पक्षी अभयारण्यात गेले काही महिने निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत कृत्रिम पाणवठे तयार करण्यासाठी श्रमदान कार्यक्रम हाती घेतला.  सर्वसामान्य नागरिकांना श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत डोंबिवली-कल्याण येथून आबालवृद्ध नागरिकांनी डोंबिवली पक्षी अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी श्रमदानातून पाणवठे बनवले.

   गिरीमित्र प्रतिष्ठान, ॲडवेंचर इंडिया,स्वयम् चॅरिटेबल ट्रस्ट,के.वी. पेंढारकर कॉलेज माजी एनसीसी असोसिएश,  निवासी विभाग प्रतिष्ठान, रोटरी क्लब, डोंबिवली मिडटाऊन,ह.भ.प. सावळाराम महाराज वनराई,उंबार्ली ग्रामस्थांची संस्था (नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचे गावातील सदस्य),रोटरी क्लब, डोंबिवली सौदामिनी, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी, बैकर्स  फाउंडेशन, शिवसाधना समूह (डोंबिवली) या सामाजिक व पर्यावरणीय संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.उंबार्ली, सोनारपाडा, दावडी, भाल, धामटन, खोनी आणि निळजे ही डोंबिवली पक्षी अभयारण्य लगतच्या गावातील ग्रामस्थ आणि डोंबिवली, कल्याण , ठाणे, कळवा आणि भिवंडी या शहरातून अनेक स्वयंसेवक या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.या उपक्रमास  नियोजनबद्ध रीतीने कामाला सुरुवात झाली.ठरल्याप्रमाणे जास्तीजास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आला.डोंबिवली पक्षी अभयारण्य मधील वरच्या बंधाऱ्याजवळ रस्त्यालगतच्या ओढ्याच्या बाजूला जंगलातील दगड, माती, पाला -पाचोळा, गवत शाकारून पाणवठ्याचा पृष्ठभागाची मशागत करण्यात आली.पाणी साठवण्यासाठी पारदर्शक प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला. साधारण १० फूट लांबीला, ३-४ फूट रुंदीला, १-२ फूट खोली असा बंधारा बांधण्यात आला आहे.

हा प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात आला आहे आणि असे अजून काही बंधारे अजून जंगलात बांधण्यात येतील. यावेळी एक टीमने बंधाऱ्या जवळच्या परिसरामधील दारूच्या बाटल्या – प्लास्टिक कचरा गोळा केल्या.जमा केलेला सर्व कचरा वरच्या बंधाऱ्यावर जवळ जमा करण्यात आला आहे, जो नंतरच्या उपक्रमात रिसायकलीसाठीदेण्यात येणार आहे.गौरीकुंड या पाणवठ्या मध्ये साचलेला गाळ आणि कचरा काढण्यात आला. त्यामुळे नैसर्गिक झरे मोकळे झाले आणि पाणी वाढले. वेगवेगळ्या संस्थेच्या एकूण ५० स्वयंसेवकांनी एकत्र मिळून नियोजपूर्वक काम केले.यापुढेही प्रत्येक रविवारी असेच उपक्रम या जंगलात वन विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षीप्रेमी मंगेश कोयंडे यांनी दिली.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!