ठाणे

शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतीबंधक लस

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील प्रभाग क्र.६७ म्हात्रे नगर येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा डोंबिवली उपशहर संघटक वसंत भगत आणि शाखाप्रमुख करण भगत यांच्या प्रयत्नाने शास्त्रीनगर रुग्णालयात सुमारे १०० ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

 राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढू लागला आहे.कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.त्यामुळे पालिकेने पुन्हा सामाजिक वावराचे नियम कडक केले आहेत.डोंबिवली शहरात लसीकरण सुरु आहे.शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा डोंबिवली उपशहर संघटक वसंत भगत यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसबाबत मार्गदर्शन करून लस टोचून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी याला प्रतिसाद देत डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात लस टोचून घेतली.तर शिवसेनेच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील मढवी शाळेजवळील पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा डोंबिवली उपशहर संघटक वसंत भगत आणि शाखाप्रमुख करण भगत यांनी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.पश्चिमेकडील पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय हे लांब असल्याने ज्येष्ठ नागरिकांना सदर रुग्णालयात जाण्यास त्रास होत आहे.नागरिकांना त्रास होऊ नये आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घ्यावी याकरता मागणी केल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत भगत यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!