ठाणे

थकबाकीदारांचे वीजमीटर कापू नका… नागरिकांना बिले भरण्यास मुदत द्या ; डोंबिवली मनसेकडून विजवितरण कार्यालयाला धडक..

डोंबिवली ( शंकर जाधव ) : २०२० साली कोरोनाने थैमान घातले होते.या वर्षात लॉकडून केल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहीचे व्यवसायह ठप्प झाले.मात्र सरकारने सामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीबाबत विचार न करता भरमसाथ विजे बिले आकारल्याने नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली.२०२१ च्या मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने बेरोजगारीत आणखीच वाढ झाली आहे.एकीकडे आपले आरोग्य सांभाळायचे आणि दुसरीकडे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी नोकरी करायची असे असताना थकबाकीदारांचे वीज मीटर कापण्याची स्थगिती उठवून हे सरकार एकप्रकारे अन्याय करत असल्याची ओरड सुरु झाली आहे.याबाबत मनसेने जनतेची बाजू मांडत थकबाकीदारांचे वीजमीटर कापू नका… नागरिकांना बिले भरण्यासाठी मुदत द्या अशी मागणी केली आहे.डोंबिवली पश्चिमेकडील आनंदनगर येथील वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली.     

        डोंबिवलीत मनसेच्या विविध शाखेत विजग्राहकांच्या वाढीव विजबिल व विजमीटर कापण्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या याची दखल घेत कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली उपशहर अध्यक्ष राजू सदू पाटील, महिला शहर संघटक सुमेधा थत्ते, शहर सचिव अरुण जांभळे, महिला उपशहर अध्यक्ष नीलिमा भोईर,श्रध्दा किर्वे, शाखाध्यक्ष केतन सावंत, महेश पांचाळ, सुधीर सप्रे,नंदकिशोर भोसले, आश्विन पाटील महिला शाखाध्यक्षा प्रिया कडू, शर्मिला लोंढे,शिवानी दळवी, महाराष्ट्र सैनिक स्वप्नील निकम,सुप्रिया साळवी यांनी डोंबिवली पश्चिमेतील विज वितरण कार्यालयाला भेट देवून मुख्य अभियंता पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष भोईर म्हणाले,ज्यांची खरोखरच आर्थिक अडचण आहे, त्यांच्याकडून एकरकमी बिल न मागता हप्त्याहप्तेची मुदत द्यावी तर  शहरअध्यक्ष घरत म्हणाले, कोरोनाच्या काळात जनता चारही बाजूने त्रासलेली असताना परस्पर विजमीटर न कापता माणुसकीच्या भावनेने सहकार्य करावे.

वीजबिले भरली नाही म्हणून अनेक ग्राहकांची वीजमिटर कापली जातात.वीजमीटर कापताना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे उत्तरे देत असून त्यांचा सर्वासमोर अपमान करत असल्याचे दिसते.वीज बिले भरण्याची इच्छा असताना कोरोनाने आर्थिक कंबरटे मोडल्याने एकरकमी बिल कसे भरणार असा वीजग्राहकांचा प्रश्न आहे.मात्र सरकारच्या आदेशाचे पालन करत असल्याचे अधिकारी वर्ग म्हणत असले तरी वीजग्राहकांशी वागणूक कशी करावी हे मात्र कर्मचाऱ्यांना सांगण्यास अधिकारी वर्ग विसरले आहेत.कर्मचाऱ्यांच्या अश्या वागणुकीमुळे मनसेने कर्मचाऱ्यांना आपल्या स्टाईलने दणका दाखवावा अशी नागरिकांचे म्हणणे आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!