मुंबई

मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरूच, ३२६० नवे रुग्ण तर १० जणांचा मृत्यू

मुंबई – मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. वर्षभरातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. सोमवार (आज) ३२६० नवे रुग्ण आढळून आले असून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक रुग्णांची नोंद
मुंबईत सोमवार (आज) २२ मार्चला ३२६० रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख ६५ हजार ९१४ वर पोहचला आहे. तर आज १० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ५९२ वर पोहचला आहे. १३२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ३ लाख २८ हजार ३१ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या २५ हजार ३७२ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ९७ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ४० चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ३१६ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३७ लाख ३० हजार ४५० चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत ७ नोव्हेंबरला ५७६, १० नोव्हेंबरला ५३५, १६ नोव्हेंबरला ४०९, १८ जानेवारीला ३९५, २४ जानेवारीला ३४८, २६ जानेवारीला ३४२, १ फेब्रुवारीला ३२८ म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!