ठाणे

सीएच्या परीक्षेतुन देशातून दुसरा क्रमांक येणाऱ्या वैभव हरिहरनचा शिवसेनेकडून सत्कार

 डोंबिवली ( शंकर जाधव) : डोंबिवली पूर्वेकडील खंबाळ पाड्यात येथे राहणाऱ्या वैभव हरिहरन  या विद्यार्थ्याने सीए च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून परीक्षेत बसलेल्या लाखो विद्यार्थ्यामधून दुसरा क्रमांक मिळवून डोंबिवलीचा झेंडा फडकवत डोंबिवलीच्या सरपोचात एक मानाचा तुरा रोवला. त्याबद्दल शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शहरशाखेच्यावतीने कल्याण लोकसभा  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या राहत्या घरी जावून सत्कार व अभिनंदन करण्यात आले.तसेच त्याला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या.

त्याप्रसंगी डोंबिवली शहराचे शहरप्रमुख राजेश मोरे , उपशहरप्रमुख संतोष चव्हाण , शाखाप्रमुख सचिन जोशी , बाळा शेलार , तेजस सावंत आदी उपस्थित होते याप्रसंगी राजेश मोरे यांनी वैभव यांच्या पालकांचे  कौतुक करत  अभिनंदन केले आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे  वैभवसाठीचा अभिनंदन व शुभेच्छांचा संदेशाबरोबर भविष्यात त्याला कोणतीही मदत लागल्यास आम्ही सहकार्य करू असा त्यांचा निरोप ही दिला.  त्यावेळी हरिहरन कुटुंबीयांनी खासदार डॉ. शिंदे  व शिवसेना डोंबिवली शाखेचे व शहरप्रमुख राजेश मोरे यांचे आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!