ठाणे

महिलेला अश्लील मेसेस करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसेकडून चोप

डोंबिवली (  शंकर जाधव ) : परप्रांतीयांना चोप दिल्याने काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या मनसेने पुन्हा एकदा आपला आक्रमकपणा दाखविण्यास सुरुवात केली आहे.एका महिलेला अश्लील मेसेज केल्याने परप्रांतीय तरुणाला मनसेने चांगलाच चोप दिला. डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा येथील एका कंपनीत या परप्रांतीय तरुण काम करतो.याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेला हा परप्रांतीय तरुणाला वारंवार अश्लील मेसेस करत होता.त्याच्या या त्रासला कंटाळून महिलेने मनसेला त्रासाबाबत माहिती दिली.मनसे रस्ते अस्थापना डोंबिवली शहर अध्यक्ष ओम लोके आणि मनसे शाखा अध्यक्ष रितेश माळी यांनी त्या परप्रांतीय तरुणाला चोप दिला.

  मनसे रस्ते अस्थापना डोंबिवली शहर अध्यक्ष लोके यांच्याकडे सदर महिलेने आपले म्हणणे मांडल्यावर लोके यांनी त्रास देणाऱ्या परप्रांतीय तरुणाला बोलावून घेतले.`महाराष्ट्रात नोकरीसाठी येता आणि येथील महिलांना अश्लील मेसेस करून त्रास देता, हे मनसे कदापीही सहन करणार नाही,असा शब्दात त्यांनी त्याला सुनावले. परप्रांतीय तरुणाने आपल्याकडून चूक झाली असून यापुढे अशी चूक होणार नाही असे सांगितल्यावर लोके यांनी त्याला  सोडून दिले. कोणत्याही कार्यालयात अथवा कंपनीत एखद्या महिलेला कोणी त्रास देत असेल तर कंपनीने त्याकडे लक्ष दिले पाहिजे असेही लोके यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!