ठाणे

सार्वजनिक ‘आरोग्य’ सेवांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढणार : जिल्हा परिषदे मार्फत राबवला जातोय ‘लोकसहभागी आरोग्य नियोजन’ ( कम्युनिटी अक्शन हेल्थ ) प्रकल्प

ठाणे दि. २४ : ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये लोक सहभाग वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत ‘लोकसहभागी आरोग्य नियोजन’ ( कम्युनिटी अक्शन हेल्थ ) हा प्रकल्प राबविला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प जिल्हात यशस्वीरित्या राबविण्यासाठी आज यशवंतराव चव्हाण सभागृह येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी मार्गदर्शन केले.

सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये हा प्रकल्प  राबवला जात असून जिल्हासाठी महाराष्ट्र मुलुंड सेवा संघाची मातृसंस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पातून गावपातलीवरील सार्वजनिक आरोग्य सेवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.  तालुका समन्वयाच्या माध्यमातून वेळोवेळी गाव भेटी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राना भेटी देऊन आरोग्य सेवा-सुविधांचा सतत आढावा घेतला जाणार आहे.  त्याचबरोबर गाव आरोग्य पाणी पुरवठा पोषण व स्वच्छता समिती, रुग्णकल्याण समिती, प्राथमिक देखरेख व नियोजन समिती, कोरोना दक्षता समिती सारख्या विविध समित्या सोबत वेळोवेळी बैठका घेऊन गाव ते प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर रुग्णांना सेवा घेताना आणि आरोग्य यंत्रणेला सेवा देताना येणाऱ्या अडचणीबद्दल चर्चा करून त्या सोडविण्यासाठी या प्रकल्प मार्फत प्रयत्न केलें जाणार आहेत. तसेच लोकांमध्ये आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत मिळणाऱ्या सेवा सुविधा याबाबत माहिती देऊन लोकांना आरोग्य हक्का मार्फत जागृत करण्यात येणार आहे. आगामी वर्षात मातृसंस्थेच्या सहकार्याने नियोजन करून ही कार्यवाही केली जाणार आहे याबाबत कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी , राज्य मातृसेवा संघ प्रतिनिधी गुरुप्रसाद कालेलकर. जिल्हा मातृसंघाचे प्रतिनिधी विनायक जोगळेकर, राज्य मातृसेवा संघाच्या श्रीमती कानिटकर , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल बाग, जिल्हा लेखा व्यवस्थापक मनिष खैरनार, जिल्हा समूह संघटक स्वप्नाली मोहिते, जिल्हा रुग्ण कल्याण समिती समन्वयक प्रतिभा निखारे उपस्थित होत्या.    

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!