मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे 74 व्या वर्षी निधन

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय एन. जाधव यांचे आज पहाटे पाऊण वाजता नेरुळ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. 1 मार्च 2007 ते 29 फेब्रुवारी 2008 दरम्यान त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त पद भूषविले होते. त्यापूर्वी ते पुण्याचे पोलीस आयुक्त होते.

कार्डियक अरेस्ट (severe cardiac arrest) मुळे त्यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षाचे होते. सातारा जिल्यातील पुसेगाव या मूळगावी त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे जाधव यांनी पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनावर राज्य केले. PC पासून DG पर्यंत सर्वांना ते आपला अधिकारी असे वाटायचे.त्यामुळे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली !

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!