महाराष्ट्र

होम क्वारंटाइन असलेले पत्रकार प्रकाश जाधव यांची आत्महत्या.

    सोलापुर : सोलापुरात एका तरुण पत्रकाराने हाताची नस कापून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. प्रकाश जाधव (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पत्रकाराचे नाव आहे.

प्रकाश हा सोलापूर शहरातील सुशीलनगरमध्ये राहत होता. पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याने सकाळ, सोलापूर तरुण भारत आणि सुराज्य दैनिकात काम केले होते. सध्या तो घरीच होता. दोन दिवसांपूर्वी वडील करोनाचे बळी ठरले. पोलीस असलेला भाऊ करोना पॉझिटिव्ह आला. आई करोनावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी प्रकाशने अनेक फेऱ्या मारल्या. मात्र, हे इंजेक्शन त्याला मिळाले नव्हते.

प्रकाश सध्या होम क्वारंटाइन होता. क्वारंटाइन असताना घरीच त्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!