मुंबई

ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी प्रा. दिपक जाधव यांची निवड.

संतोष पडवळ – १९ एप्रिल २०२१ ( प्रतिनिधी ) ः फ्रि प्रेस मिडिया इंग्रजी तथा दैनिक नवशक्तिचे विशेष प्रतिनिधी प्रा. दिपक जाधव यांची माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित असलेल्या ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड करण्यात आली आहे.

ही निवड ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे. राष्ट्रीय महासचिव राजेशजी आंधळे. संदिपजी जाधव. अरविंदजी सोनवणे. राहुलजी गवारे. नितीनजी डांगळे. रोहिणी भामरे. विद्याताई गडाख. अॕड. शहाजी वानखेडे. रेखा निकुंभ या पदाधिका-यांनी एकमताने केली आहे.जागो ग्राहक जागो हा नारा देत ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती देशभर कार्य करीत आहे. प्रा. दिपक जाधव गेली अनेक वर्ष पत्रकारितेत कार्यरत आहेत तथा पत्रकारितेच्या विविध महाविद्यालयांत अध्यापन करीत आहेत. जाधव यांनी सामाजिक कार्य करतांना पत्रकारितेच्या माध्यमातून तळागाळातील विविध सामाजिक विषयांना वाचा फोडली आहे. जाधव यांनी आजवर अनेक हटके विषयांवर लेखन दिग्दर्शन करून लघुपट बनवले आहेत. नुकताच त्यांचा फिर वही रात या नावाचा हिंदी सिनेमा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी जाधव यांची निवड झाल्याने त्यांच्यावर समाजाच्या सर्वच थरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!