ठाणे

कामाच्या वतीने डोंबिवलीत अन्नदान… एम्स रुग्णालयास व्हेंटीलेटर भेट

 डोंबिवली ( शंकर जाधव )  : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शासनाने टाळेबंदी जाहिर केली आहे. त्यामुळे  अन्नपदार्थ  निर्मिती करणाऱ्यांवर बंधने आली आहेत.हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे अन्नावाचून परवड होत  असून, हि बाब लक्षात घेउन आणि शासनाने केलेल्या आवाहननुसार   कल्याण अंबरनाथ मँन्युफँकरर्स असोसिएशनच्या ( कामा)  वतीने डोंबिवली येथे बुधवार २१ एप्रिल पासून दररोज अन्नदान करण्यात येणार आहे.अशी माहिती कामा चे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.आज डोंबिवलीतचार ठिकांणा तून   अन्नदानास सुरुवात करण्यात आली. शेलार नाका येथील इंदिरानगर , त्रिमूर्तनगर, एमआयडीसी तील काही क़ंपन्यातील कँन्टिन सेवा कोवीड सुरक्षिततेसाठी स्थगित केली आहे. तेथील कामगारांना अन्नदान करण्यात आले.तुळजाभवानी महिला बचत गटाच्या महिलांनी आजचे जेवण तयार केले होते.

     राज्यातील वाढत्या करोनाच्या रुग्ण संख्येमुळे राज्यशासनाने १ मे  सकाळ पर्यंत टाळेबंदी जाहिर केली आहे. या टाळेबंदीमुळे गरिबांना परवडणा- या अन्ननिर्मिती करण्यावर बंधने आली आहेत.   त्यामुळे  हातावर पोट असणा- याज  गरिबांची परवड सुरु झाली आहे.  देशातील विविध राज्यातील शहराप्रमाणे डोंबिवली येथे करोना च्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा प्रभाव वाढू लागला आहे.अत्यावश्यक आणि किराणा दुकाने सोडल्यास सर्वच बंद असल्याने गरिबांचे हाल होत आहेत.हि बाब लक्षात घेउन आणि शासनाच्या आवाहनुसार उद्योजकांच्या कामा संघटनेच्या वतीने

डोंबिवली येथे अन्नदान सुरु करण्यात आले.घरडा सर्कल १००पाकिटे,   शेलार नाका २०० पाकिटे , मानपाडा रोड शनी मंदिर -७५पाकिटे , नवरंग नाका- १०० पाकिटांचे वाटप चार ठिकाणी करण्यात आले. कामाच्या वतीने   ३०एप्रिल पर्यंत दररोज अन्नदान करण्यात येणार आहे.अन्नदान ज्या ठिकाणी करण्यात येईल ती जागा समाज माध्यमातून कळविली जाईल. .अन्नदान ठिकाणी अन्नदान  फक्त पार्सल दिले जाईल.तिथे उभे राहून किंवा बसून खाता येणार नाही. अन्नदान समयी गरजुनी सामाजिक अंतराचे भान राखणे, मास्क लावणे गरजेचे आहे.कोवीड संबधी  शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. अन्नदान समयी कामाचे अध्यक्ष देवेन सोनी, उपाध्यक्ष नारायण टेकाडे, सेक्रेटरी राजू बेल्लूर, माजी सदस्य जयवंत सावंत, आशिष भानुशाली, राहुल कासलीवाल, उदय वालावलकर, सुरेश जैन  आणि कामाचे  सदस्य, भाजप पदाधिकारी राजू शेख उपस्थित होते.तसेच कामा कार्यालयाच्या प्रांगणात विविध कारखान्यातील पुरुष- महिला कामगारांसाठी अँन्टीजन चाचणी आयोजित करण्यात आली होती.     

त्याचप्रमाणे श्रीजी लाईफस्टाईल प्र.ली चे मालक देशबंधू कागजी  यांनी देशबंधू कागजी ट्रस्टच्या वतीने  डोंबिवली येथील एम्स रुग्णालयास साडेतेरा लाखांचा व्हेटीलेटर भेट देण्यात आला आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!