ठाणे

ठाण्यात उपचारदरम्यान चार कोरोना रुग्णांचा मृत्यू ; ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.

 ठाणे, ता २६, : ठाण्यात वतर्कनगर येथील वेदांत रुग्णालयाकडून ऑक्सिजनचे नियोजन न केल्याने सहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच खासगी रुग्णालयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे ही पाचंगे यांनी सांगितले आहे. त्यातच ऑक्सिजन सिलिंडर आता पुरवण्यात आले असून महापालिकामार्फत ही रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथील खाजगी कोविडं या वेदांत रुगणालायत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाकडून मृत्यू चे कारण अजून सांगण्यात आले नाही. रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णालय परिसरात आक्रोश सुरू आहे. मृत झालेल्या रूग्णांची अरुण शेलार (५१), करुणा पष्टे (६७), विजय पाटील (५७), दिनेश पणकार (४१) अशी नावे आहेत.

ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असताना दुसरीकडे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रशासनाला योग्य ती कारवाई आणि चौकशी करावी. रुग्ण हे अत्यवस्थ (क्रीटकल) होते असे डावखरे याना रुग्णालय यांनी कळवले आहे. रुग्णालय खाली नातेवाईक आणि मनसे भाजप पक्षाचे पदाधिकारी जमले असून रुग्णालय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच मृत रुग्णाच्या नातेवाईकांचे बिले घेऊ नये अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चौकशी करण्याची मागणी देखील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. या संपुर्ण प्रकरणात मनसेनेही चौकशीची मागणी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!