ठाणे

ठाण्याजवळील मुंब्रा परिसरातील हॉस्पिटलमध्ये आग : 4 रुग्णांचा मृत्यू

मुंब्रा:- मुब्रा येथील एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील ६ पैकी ४ रुग्णांचा मृत्यु झाला. बुधवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली होती. शॉट सर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांचा मृत्यु हा आगी मुळे नाही तर आगीच्या घटनेनंतर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले.

राज्यात कोरोनाच्या संकटांबरोबरच आता रुग्णालयांना आगी लागण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. एका बाजूला उपचारासाठी बेड मिळत नाही आणि बेड मिळाल्यावर आगीमध्ये रुग्णांचा मृत्यु होत आहे. यास्मीन सय्यद (वय ४६), नवाब शेख (वय ४७) हलिमा सलमानी (वय ७०) आणि हरीश सोनावणे (वय ५७) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून आगी घटना का व कशी घडली हे शोधण्यासाठी समिती नेमून ती चौकशी करेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!