ठाणे

डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात लुट : अॅटीजेन टेस्टसाठी तब्बल १२०० रुपये आकारले…

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : २०२० साली कोरोनाने राज्यात थैमान घातला होता.अश्या या बिकट परिस्थिती सरकारने एकीकडे लॉकडाऊन जाहीर केले केल्याने गरिबांना पोटासाठी अन्न मिळत नव्हते. तर दुसरीकडे कोरीना चाचणीच्या नावाखाली खाजगी रुग्णालये लुट करत असल्याचे सरकारला लक्षात आल्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना तपासणीचे दर कमी करून ते किती आकारावे असे जाहीर केले.२०२१ साली फेब्रेवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली.परिस्थिती एवढी भयंकर असताना खाजगी रुग्णालयात लुट सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयाच्या स्पंदन डायनोस्टिक सेटरमध्ये   एका नागरिकाकडून अॅटीजेन टेस्टसाठी तब्बल १२०० रुपये आकारले.सरकारी दरापेक्षा जास्त रक्कम घेतल्याने तपासणी करणाऱ्या नागरिकाने यावर आवाज उठवला आहे.शिवसेनेचे राजेश कदम यांनी सदर घडलेला प्रकारवर रुग्णालयावर नाराजी व्यक्त केली.

    सरकारी नियमानुसार कोरोना अॅटीजेन टेस्टचे खाजगी रुग्णालयात २०० रुपये आकारले जातात.मात्र खाजगी रुग्णालयाने यातही आपला फायदा कसा होईल याकडे लक्ष दिल्याचे दिसते.डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात स्पंदन डायनोस्टिक सेटरमध्ये एका नागरिकाने अॅटीजेन टेस्ट करून घेतली. सरकारी नियमानुसार कोरोना अॅटीजेन टेस्टचे २०० रुपये  आकारणे योग्य होते.परंतु तसे न होता या टेस्टचे १२०० रुपये आकरण्यात आले. विशेष म्हणजे या सेटरने या टेस्टसाठी १०० रुपये आकारल्याचे बिलही नागरिकाला दिले. आपली लुट झाल्याचे समजताच त्यांनी शिवसेनेचे राजेश कदम यांच्या निदर्शनात ही बाबा आणली.अश्या कठीण परिस्थितीत नागरिकांची लुट होत असल्याचे समजताच कदम यांनी सेटरच्या अश्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

याबाबत कदम यांना विचारलेअसता ते म्हणाले. अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात येत असतात. या लुटीचा आम्हाला प्रत्यक्ष ऑनलाईन व्हिडीओ काढून जाब विचारता आला असता.परंतु सध्याची वेळ व्हिडीओ काढत बसण्याची नाही.लुट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांनी यातून वेळीच धडा घेतला पाहिजे.या कोरोनाच्या संकटात रुग्णालये , डॉक्टर्स हे आमचे देव आहेत.कृपया गरजवंन नागरिकांची लुबाडणूक करायचे त्वरित थांबवा.अश्या रुग्णालयाच्या एका चुकीने संपर्ण यंत्रणा दोषी ठरविली जाते.महानगरपालिकेकडे सदर रूग्णालयाच्या सेटरच्या प्रकारची तक्रार केली आहे. महानगरपालिकेने अश्या सेटरवर कारवाई केली पाहिजे.

तर घडलेल्या प्रकाराबाबत स्पंदन डायनोस्टिक सेटरच्या श्रद्धा कोप यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आमच्या काही कर्मचाऱ्यांकडून अॅटीजेन टेस्टची चुकून जास्त आकारणी करण्यात आली आहे. खरतर आमच्या रुग्णालयात अॅटीजेन टेस्ट केली जात नाही. परंतु सदर नागरिकाने आमच्याकडे खूपच विनंती केल्याने आम्ही त्याची अॅटीजेन टेस्ट केली. आम्ही सदर नागरिकांला जास्तीचे पैसे जे आकारले होते ते परत करण्यास तयार आहोत.ही अनावधाने चूक झाली आहे.यासंदर्भात पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद होता.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!