ठाणे

डोंबिवलीतील एमबी ग्रुपकडून वृक्षारोपण

 डोंबिवली ( शंकर जाधव ): कोरोनाच्या संकटात सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे सरकारने निर्देश दिले आहे जनतेनेही सरकारला मदत करत त्यांच्या निर्देशाचे पालन करत आहेत.डोंबिवली पश्चिमेकडील पारंपारिक जत्राही यंदा रद्द झाली आहे.येथील एमबी ग्रुपमधील नितीन म्हात्रे,विजय भोईर, समीर भोईर, कुणाल म्हात्रे, योगेश म्हात्रे, यांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करा, हि आपली जबाबदारी आहे असा संदेश दिला आहे.डोंबिवलीतील सर्वच तरुण वर्ग कोरोना काळात नागरिकांना मदत करत आहे.

वृक्षारोपणाच्या या संदेशाने पालिका प्रशासनाकडूनही या तरुणांचे शब्दसुमनाने कौतुक होणे आवश्यक आहे.`स्वच्छ डोंबिवली हरित डोंबिवली`हे करून दाखवण्यासाठी अश्या तरुणांची शहराला गरज असून शहरातील अनेक तरुणांनी शहराच्या विकासासाठी पुढे अआले पाहिजे आहे एम बी ग्रुपचे म्हणणे आहे. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!