ठाणे

शासकीय नियमानुसार बालक दत्तक घ्यावे

ठाणे :- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कोविड मुळे दोन्ही पालक मृत्यु पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तकासाठी उपलब्ध आहेत असे संदेश फेसबुक व व्हॉट्सॲपवर फिरत आहेत. परंतु हे मेसेजेस चुकीचे आहेत आणि अशा प्रकारे बालके दत्तकास दिली गेली तर ते बेकायदेशिर आहे.

            तरी उपरोक्त विषयाचे गांभिर्य लक्षात घेता आपणास कळविण्यात येते की, महिला व बाल विकास आयुक्तालय आणि Save The Children (India)  यांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या मदत कक्षात संपर्क करण्यासाठीचे मोबाईल नंबर पुढील प्रमाणे आहे.

            8308992222              सकाळी 8.00 ते रात्री 8.00

            7400015518              सकाळी 8.00 ते रात्री 8.00

            अशा प्रकारे कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यु झाला असले आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी उपरोक्त नमुद हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्यात यावा. उपरोक्त संपर्क क्रमांकावर सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या दरम्यान संपर्क करण्यात यावा.

            तसेच बालकांसाठी या पुर्वी सुरु असलेली हेल्पलाईनही उपलब्ध आहे. असे जिल्हा महिला व बालक विकास अधिकारी, ठाणे यांनी कळविले आहे.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!