ठाणे

भारतीय मराठा संघाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन.

    ठाणे, ता १९, (संतोष पडवळ) : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारण्यात आल्याच्या अनुषंगाने व मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिक रित्या मागासलेला असून महाराष्ट्रातील एकूण मराठा बांधवांपैकी फक्त चार ते पाच टक्के मराठा बांधव आर्थिक आणि शैक्षणिक रित्या सक्षम आहेत बाकी उर्वरित मराठा बांधव आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही आहे म्हणून मराठा समाज शिक्षण आणि नोकरी याच दोन बाबतीत आरक्षण मागत,     आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असणारा चार ते पाच टक्के मराठा म्हणजे मोठे बागायतीदार शेतकरी, शिक्षण समूहातील, सहकार क्षेत्रातील साखर कारखानदार आणि दुध संघाच्या माध्यमातून सक्षम झालेला मराठा म्हणजे सर्व मराठा समाजातील मराठा हा सक्षम नाही   

 एकूण मराठा समाजापैकी ९६% मराठा हा आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे प्रत्यक्ष पाहणी मध्ये दिसून आले आहे, असे असताना सुप्रीम कोर्टाने मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही हा जावई शोध लावून मराठा समाजाला आरक्षण दिले जावू शकत नाही असा निकाल देऊन समस्त मराठा बांधवांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत     मा.जिल्हा अधिकारी साहेब आम्ही आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री मा.श्री.उद्ववजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे विनंती करत आहोत की राज्य सरकारने कायदेशीर मार्गाने जावून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या कसा मागासलेला आहे याची योग्य पद्धतीने मांडणी करून आम्हाला आरक्षण मिळावे यासाठी मनापासून प्रयत्न करावेत हिच समस्त महाराष्ट्रातील मराठा समाज्याची मागणी आहे,   

  आम्ही आरक्षण साठी संपुर्ण महाराष्ट्रात शांतपणे ५८ मोर्चे काढून मराठा समाज्याच्या मागण्या मायबाप सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या असताना आपण आम्हाला काय दिलं गेलं याचा विचार करावा, अन्यथा आम्ही उग्र रूप धारण करून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करू शकतो त्यावेळी आमची मागणी वेगळीच असेल, सर्व गोष्टी मध्ये  “समान नागरी कायदा”    आम्ही आरक्षणाबाबत मागणी करत असताना इतर कोणत्याही समाज्याच्या आरक्षणला हात न लावता आम्हाला आरक्षण दिले जावे, असे असताना इतर समाजातील राजकीय पटलावर काम करत असलेले राजकीय पुढारी मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी कष्टाची पराकाष्ठा करत आहेत,   

           प्रसंगी भारतीय मराठा संघाच्या वतीने दिपक पालांडे,  एस.डी. पाटील, प्रकाश पाटील,सौ.विद्या कदम, निलेश मस्कर, अरूण फणसे,  उमेश गोगावले, सौ.शिल्पा निंबाळकर, निकेश खानविलकर, सौ.निकीता सालप इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!