गुन्हे वृत्त

दोन लाखाची लाच घेताना DYSP सह दोन पोलीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

जालना : ऍट्रसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर अशोक खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आज गुरुवारी दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

जातीवाचक शिवीगाळ केलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती तीन लाख देण्याचे ठरले होते. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.18 व 19 मी असे दोन दिवस लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर आज गुरुवारी सापळा रचून कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे यास तक्रारदार यांच्याकडून 2 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांच्यासह त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असलेला विठ्ठल खार्डे, या तिघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


दरम्यान या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!