ठाणे

खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या खासदार निधीतून उभा राहणार शास्त्रीनगर सामान्य रूग्णालयातील बालरोग विभाग

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र  राज्यात कोरोनाची तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रमाणात बाधित होणार असल्याचीही शक्यता वर्तवली आहे.अशी परिस्थिती उद्भवल्यास लहान मुलांसाठी हाय फ्लो यंत्रणा उभारण्यासाठी व ज्या मुलांना गहन वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते, त्यांना समर्पित नवजात आईसीयू घटकांमध्ये ठेवले जाते. यापैकी प्रत्येक एनआयसीयू युनिट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुसज्ज असे बालरोग विभाग तसेच एनआयसीयु व बालरोग गहन काळजी युनिट  असणे अत्यंत गरजेचे असल्याचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. जेणेकरून लहान बालकांना त्वरित उपचार घेता येऊ शकतो.

सदर बाब लक्षात घेत केडीएमसीच्या डोंबिवलीतील  शास्त्रीनगर रुग्णालयत अशा प्रकारचे सुसज्ज असे पेडिएट्रिक युनिट निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ज्यामध्ये४० ते ५० खाटांचा बालरोग विभाग, १० खाटांचा नवजात आणि अतिदक्षता विभाग ,१० खाटांचा बालरोग अतिदक्षता विभाग,१० बालरोग वेंटिलेटर, बालरोग उपकरणे प्राणवायू वाहिन्या  यांचा समावेश असेल. सदर बालरोग विभाग व अतिदक्षता विभाग कोरोनाची साथ संपल्यानंतरही कार्यान्वित राहील, जेणेकरून कल्याण डोंबिवली महापालिकेस कायमस्वरुपी बालरोग विभाग असलेले रुग्णालय मिळेल आणि याचा फायदा जवळील शहरातील व खेड्यांमधील लहान बालकांना देखील होईल.

या अनुषंगाने यासाठी लागणारा १ कोटी २५ लक्ष इतका निधी हा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या खासदार निधीतून देण्याकरिता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेत लवकरात लवकर सदर निधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस सुपूर्त करण्याचे सूचना दिल्या.सदर बैठकीत कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, क.डों.म.पा.महापौर विनिता राणे, नगरसेवक राजेश मोरे, विश्वनाथ राणे, व राजेश कदम, राहुल लोंढे उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!