ठाणे

कामराज मर्चंटस वेल्फेअर असोसिएशन (रजि.) अंबरनाथच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप

माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्याहस्ते करण्यात आले ओळखपत्राचे वाटप

अंबरनाथ दि. २८ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : कामराज मर्चंटस वेल्फेअर असोसिएशन (रजि.) अंबरनाथ यांच्या वतीने अंबरनाथ येथील जनसंपर्क कार्यालय येथे एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असोसिएशनच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, त्यानंतर कामराज मर्चंट्स वेल्फेअर असोसिएशन (रजि.) च्या नवीन सभासदांना माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अब्दुलभाई यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

        यावेळी कामराज मर्चंटस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सीपी कुमार, सचिव व्ही तंगराज नाडार, खजिनदार सॅम्युअल, रामदास, इसाक, जोसेफ, फिरोज खान, सेलोराज, फ्रान्सीस, डेव्हिड, तंब्बी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!