प्रासंगिक लेख

तंबाखू मुक्त महाराष्ट्रासाठी “कमिट टू क्वीट” चे अनुपालन

       १९८७ मध्ये WHO च्या स्टेट मेंबर कडून सुरू झालेले हे कार्य अख्या जगाचे तंबाखू महामारी कडे लक्ष वेधून घेण्यासाठी व तंबाखू मुळे मानवजातीवर होणाऱ्या परिणामाचे जनजागृती करण्यासाठी करण्यात आले. ह्यामुळे तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर काय परिणाम होतो व त्यामुळे होणारे मृत्यू विषयी माहिती प्राप्त होते. तंबाखू कुठच्याही स्वरुपात प्राप्त करणे हानिकारक आहे. आत्तापर्यंत तंबाखू सेवन मुळे जगात ८० लाख लोक मृत्यूमुखी पावले आहेत.

       GLOBAL ADULT SURVEY (GAT) च्या २०१६ – २०१७ च्या systematic monitoring of adult tobacco use (smoking or smokingless) नुसार असे निदर्शनात आले की १९% पुरुष व २% महिला मिळून १०.७% संपूर्ण जनसंख्येच्या एकूण ९९५ लाख प्रौढ लोक धूर असणार्‍या तंबाखू चे सेवन करतात व २९.६% पुरुष आणि १२.८% महिला मिळून २१.४% संपूर्ण जनसंख्येच्या एकूण १९९४ लाख प्रौढ लोक धूर विरहित तंबाखू चे सेवन करतात. साधारणतः ४२.४% पुरुष आणि १४.२% महिला मिळून २८.६% संपूर्ण जनसंख्येच्या एकूण २६६८ लाख प्रौढ लोक एकूण धूर व धूर विरहित तंबाखू चे सेवन करतात. त्यांच्यापैकी ५४.४% लोक तंबाखू सोडण्याचा विचार करतांना आढळले.

      जागतिक आरोग्य संघटना दर वर्षी विविध प्रकारे तंबाखू विषयी जागतिक जनजागृती विषयी कथानक (theme) बनवत असतात. २०२१ ह्या वर्षी चे कथानक (theme) #CommitToQuit असे आहे. साधारण जनजागृतीसाठी लेक्चर घेणे, सेमिनार ठेवणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर मेकिंग ह्या माध्यमातून सरकारी व खाजगी शाळा व कॉलेज मध्ये जंनजागृती केली जाते. ठाणे जिल्हयातच आत्तापर्यंत १४६ ट्रेनिंग सेशन्स मधून ८३९१ लोकांना ट्रेनिंग देण्यात आलेले आहे. NTPC (राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) नुसार विविध सरकारी व खाजगी कार्यालयांमध्ये मौखिक कर्क रोगाचे निदान करण्याचे शिबीर राबवले गेले होते. ह्या शिबिरांमधून आत्तापर्यंत १२ कर्करोग रुग्णांचे निदान केले गेले व त्यांचे उपचार ही सध्या चालू आहेत व त्यांच्या उपचारचा पाठपुरावा केला जात आहे. तसेच NO SMOKING ZONE व NO TOBACCO ZONE ह्या बॅनर्स चा वापर  कार्यालयीन जागेत करण्यात आलेले आहे.

      COTPA अॅक्ट (Ciggirate Other Tobacco Product Act) २००३ याची प्रभावी अमलबजावणी करण्यात आली. त्या अनुषंगाने तंबाखू प्रतिबंधित जागांमध्ये चालान चे संग्रह. २०१८ ते २०२१ पर्यन्त रुपये ९,७६,००० एवढे चालान ४१८३३ लोकांकडून COTPA अॅक्ट च्या मार्फत प्राप्त केले आहेत.

     TCC (Tobacco Cessation Centers)  – आत्तापर्यंत आपण ११ TCC (Tobacco Cessation Centers) कार्यरत आहेत ( ग्रामीण रुग्णालय बदलापूर, ग्रामीण रुग्णालय मुरबाड, ग्रामीण रुग्णालय गोवेली, ग्रामीण रुग्णालय अंबाडीफाटा, ग्रामीण रुग्णालय खरडी, उपजिल्हा रुग्णालय शहापूर, उपजिल्हा रुग्णालय भिवंडी, मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर ०३, स्त्री रुग्णालय उल्हासनगर ०४, सामान्य रुग्णालय मालवणी व सामान्य रुग्णालय ठाणे). त्यांच्या मार्फत लोकांचे समुपदेशनाचे कार्यक्रम नियमितपणे करण्यात येते व तंबाखू ची सवय सोडण्याचे उपक्रम राबवले जातात. आत्तापर्यंत TCC च्या मार्फत २७७७० लोकांची नोंद झाली असून त्यापैकी १७५१ लोकांचे तंबाखू चे सेवन सोडलेले आहे.

     तंबाखू मुक्त शाळा व महाविद्यालय व कार्यालय करण्यासाठी अविरत काम करत आहोत. सध्या ठाणे जिल्ह्यात १०७ शाळा ह्या तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या निखसानुसार या निकषांची पूर्तता केल्यानंतर या शाळा तंबाखू मुक्त घोषित करण्यात आलेल्या आहेत. तसच सर्व शासकीय व खाजगी कार्यालय यांना ही तंबाखू मुक्त करण्याचे धोरण हाती घेण्यात आलेले आहे. वरील सर्व उपक्रम राबवत असतांना वेळोवेळी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन मा. उपसंचालक डॉ गौरी राठोड व मा जिल्हाशल्यचिकित्सक डॉ कैलाश पवार यांनी केले.

       सामान्य रुग्णालय ठाणे आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालय येथे आम्ही तंबाखू सेवनाचे परिणाम व तंबाखू सेवनाने मनुष्य जीवनावर होणारे परिणाम दाखवत जनजागृती करतो. तंबाखू मुळे आपली रोगप्रतिकरशक्ती कमी होते व कोविड१९ च्या महामारी मध्ये असे लोक संक्रमित होऊ शकतात. एका डॉक्टर च्या नात्याने माला असे वाटते की भरपूर आजार तंबाखूचे सेवन थांबवल्याणे टाळता येऊ शकतात. त्यामुळे लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य पण उत्तम राहील व त्यांचा परिवार ही सुखाने राहू शकतो.

       चला आपण संकल्प करू “तंबाखू व तांबखुजन्य पदार्थ सोडण्याचा” व “तंबाखू मुक्त महाराष्ट्र करण्याचा”

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!