ठाणे

कै.अण्णा कुर्मा चौधरी (बाबा) यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त रक्तदान आणि गरजूंना अन्नधान्य वाटप

डोंबिवली  ( शंकर जाधव ) : रक्तदान हेच जीवनदान , रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. करोनाकाळातील परिस्थितीत रक्तपेढ्यांमधील साठा कमी पडू नये म्हणून कै.अण्णा कुर्मा चौधरी (बाबा) यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त रक्तदान आणि गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले.काही वकिलांना देखील अन्नधान्य वाटप करण्यात आले.  डोंबिवली पश्चिम येथील गणेश नगर, गणेश टाँवर  येथे हा उपक्रम करण्यात आला होता. मनसेचे कल्याण  ग्रामीण मतदार संघाचे आमदार प्रमोद( राजू)  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे इंपिरिअल ग्रुपचे विकी चौधरी यांनी सांगितले.

याबाबत विकी चौधरी म्हणाले कि, आमचे वडील कै. अण्णा कुर्मा चौधरी यांना समाजिक कार्याची आवड होती.त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही मित्रांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवित असतो.आज रक्तदान शिबिरात डोंबिवली येथल अनेक तरुणांनी रक्तदान केले.तसेच काही वकिलांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.त्याचा स्विकार वकिल संघटनेचे प्रतिनिधी अँड प्रदीप बावसकर यांनी केला.

या शिबिरासाठी प्रकाश दादा भोईर, सौरभ चौधरी, संदिप (रमा) म्हात्रे, अँड प्रदिप बावस्कर, प्रेम पाटील ,राजेश शेट्टी, विराज पाटील, वैभव मुरबाडे यांनी शिबीर साठी विशेष सहकार्य केले.तर साई सखा मित्र म़डळ आणि, खानदेश हित संग्राम कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!