ठाणे

‘जलदात्या’ हिरा पाटील यांचा खर्डीत आगळावेगळा वाढदिवस – कृतज्ञतेपोटी सोसायट्यांनी केले अनोखे सेलिब्रेशन

दिवा, दि. ८ (बातमीदार) – पाण्यासारखा धर्म नाही, असे म्हणतात तेच खरे. खर्डी विभागातील जनतेच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न दूर करणारे जलदाते, नगरसेवक हिरा पाटील यांना हा धर्म किती महान आहे, याची प्रचिती नुकतीच आली आहे. त्यांनी पाण्याचा प्रश्न दूर केल्याने खर्डी विभागातील सोसायट्यांनी त्यांच्याप्रती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या सोसायट्यांनी आपल्या आवारात पाटील यांना निमंर्त्रित केले आणि कोविड नियमावलीचे पालन करून त्यांचा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.

खर्डी विभागातील पाणीटंचाईचा प्रश्न गेेेेल्या काही वर्षांपासून ‘जैसे थे’ होता. त्यामुळे येथील सोसायट्यांना दर महिन्याला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. या टँकरसाठी महिन्याला जवळपास ५० ते ६० लाखांचा भुर्दंड सोसावा लागत होता. हा प्रश्न दूर करण्यासाठी हिरा पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन खार्डी विभागातील रहिवाशांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आणि टँकरने पाणी मागवण्याची गैरसोय दूर झाली आहे. याबद्दल कृतज्ञता म्हणून खार्डीच्या सोसायट्यांनी हिरा पाटील यांचा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. रहिवाशांनी कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून पाटील यांच्या घरी न जाता त्यांना आपल्याच आवारात बोलावले व कोविड नियमावलीचे पालन करीत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. पाटील यांनी पाणीप्रश्न दूर करण्याचे फार महत्त्वाचे कार्य केले आहे. आम्हा रहिवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे हिरा पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य समजतो, अशी प्रतिक्रिया खार्डीतील रहिवाशांनी दिली.

या सोसायट्यांनी साजरा केला पाटील यांचा वाढदिवस

खार्डी विभागातील सुदामा रिजन्सी फेज १,२,३, विघ्नहर्ता रेसिडेन्सी सोसायटी, ओम रेसिडेन्सी सोसायटी, लक्ष्मी रेसिडेन्सी सोसायटी, निर्मल नगरी सोसायटी, अंबर सोसायटी, दोस्ती रेसिडेन्सी, चिराग हाईट्स, साई सृष्टी सोसायटी, सनराईज सोसायटी या सोसायट्यांनी अनोख्या पद्धतीने हिरा पाटील यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. दरम्यान, परिसरातील पथदिव्यांचेही उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडले.

PHOTO GALLAREY :

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!