ठाणे

महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघाचे लाक्षणिक उपोषण.

ठाणे, ता ९, (संतोष पडवळ) :  महाराष्ट्रातील पदवीधर डी.एड. माध्यमिक शिक्षकांवर सेवाज्येष्ठता व पदोन्नतीच्या बाबतीत सातत्याने अन्याय होतो आहे.हा अन्याय दूर करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे 8जून 2020 ची अधिसूचना प्रसारित करण्यात आली.

या अधिसूचनेत पदवीधर डी.एड.शिक्षकांचा प्रवर्ग क मध्ये समावेश केला असला तरी एक वर्ष होऊनही आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.त्यामुळे या वर्षात देखील पदवीधर डी.एड. शिक्षकांना सेवाजेष्ठता आणि पदोन्नती मिळू शकलेली नाही. यासाठी संघटनेने शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री ,शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त ,शिक्षण संचालक यांच्याशी भेट घेऊन संवाद साधलेला होता, मीटिंग झालेली होती. संघटना सातत्याने अनेक निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा करत आहे . परंतु अद्याप  कार्यवाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पदवीधर डीएड शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहावे लागले आहे. त्याचा निषेध म्हणून आज  ८ जून २०२१ रोजी शिक्षकांनी स्वतःच्या घरांमधून लाक्षणिक उपोषण केले. व प्रतिनिधिक स्वरुपात महाराष्ट्रातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण राज्य मंत्री,तसेच शिक्षक आमदार,व शिक्षण प्रशासनातील अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयात संघटनेचे मार्गदर्शक श्री.दिनेश कुटे, श्री.खाडे सरांनी निवेदन दिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!