ठाणे

शिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण

डोंबिवली ( शंकर जाधव ) : एमआयडीसी शिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. वडाचे झाडाचे बहुउपयोगी तसेच आयुर्वेदातील महत्त्व आणि सद्याचा करोना महामारीचा दिवसात ऑक्सीजनची गरज ओळखून सर्वात जास्त ऑक्सीजन देणारे झाड याचे महत्त्व ओळखून डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील शिवसेनेचा महिला आघाडीतर्फे पाच वडाचा वृक्षांचे वृक्षारोपण वटपौर्णिमेनिमित्त  केले. या वडाचा वृक्षांचे पुढे वर्षभर संगोपन व रक्षण करण्याची जबाबदारी या महिलांनी घेतली आहे.

निवासी भागात लावलेल्या पाच झाडापैकी एक वडाचे झाड सुदामा नगर मधील श्रीराम आर्केड सोसायटी जवळ लावण्यात आल्यानंतर त्याची रीतसर पूजा करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना एमआयडीसी महिला शाखाप्रमुख, संघटक अनुजा सावंत तसेच  सुप्रिया तावडे, मुग्धा मुकादम, वनिता सावंत, सुनंदा स्वर्गे इत्यादी महिला उपस्थित होत्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!