ठाणे

सलग तिसऱ्या दिवशीही अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई६ बांधकामे केली जमीनदोस्त

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच असून आज ६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका क्षेत्रात जी बांधकामे अनधिकृतरित्या पूर्ण झाली आहेत व तेथे रहिवास सुरु झालेला नाही तसेच निवास सुरु झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत विहीत प्रक्रिया पार पाडून अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना यापूर्वीच दिले आहेत.

त्यानुषंगाने शहरात प्रभागसमितीनिहाय अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये आज माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकूम येथील ३ आरसीसी बांधकाम व १ ढाबा जमीनदोस्त करण्यात आला. तर कळवा प्रभागसमितीमधील १ आणि नौपाडा प्रभाग समितीमधील १ आरसीसी बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर, सचिन बोरसे व शंकर पाटोळे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!