ठाणे

सी.एस.आर. उपक्रमांतर्गत सोलारा कंपनीकडून अंबरनाथ शासकीय आयटीआयला प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपयुक्त असे संगणक व शैक्षणिक सहित्य भेट

अंबरनाथ दि. ०१ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  :  अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी येथील सोलारा लाईफ सायन्सेस या कंपनीकडून शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथे सोमवारी प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपयुक्त असे संगणक व शैक्षणिक सहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. या अंतर्गत आय. टी. आय. च्या प्रशिक्षणार्थ्यांचे कौशल्य वृद्धिंगत व्हावे, संस्था विकास व संस्थेचा दर्जवाढ यासाठी सोलारा कंपनीने १६ संगणक, २ प्रिंटर व १ यूपीएस संच हे साहित्य संस्थेला देणगी स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरही बसवून देणार असल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

             अंबरनाथच्या आय. टी.आय. येथे सुमारे १७०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून त्यांच्या अभ्यासक्रमातील संगणक विषयक प्रशिक्षणासाठी सदरचे संगणक उपयुक्त ठरणार असून ऑनलाइन प्रशिक्षण व ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठीही संगणक हे उपयुक्त होतील. असे अंबरनाथ आयटीआयचे प्राचार्य अजित शिंदे यांनी सांगितले, शिंदे यांनी सोलारा कंपनी व्यवस्थापनाचे व उपस्थित कंपनी अधिकाऱ्यांचे आभार मानले. 

        कंपनीच्या सी.एस.आर.पॉलिसी अन्वये सदरचे साहित्य आय. टी.आय. ला भेट देण्यात आलेले असून ते सुमारे १२ लाख रुपये किमतीचे आहे. आय. टी.आय. अंबरनाथ मार्फत सीएसआर कनेक्ट उपक्रम राबविला जात असून या अंतर्गत विविध कंपन्यांना भेटी देऊन संस्था विकासासाठी व दर्जावाढीसाठी कंपन्यांचे सहाय्य घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोलारा कंपनीने संस्थेला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व आपले सामाजिक भान व्यक्त केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. कंपनी अधिकाऱ्यांनीही आय. टी.आय. स्टाफने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेचे कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार मनोज वाणी यांनी वेळोवेळी सोलारा कंपनीशी समन्वय साधून या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न असल्याचे प्राचार्य अजित शिंदे यांनी सांगितले.             

याप्रसंगी सोलारा लाईफ सायन्सेसचे प्लांट हेड संतोष बढे, अडमीन मॅनेजर सदानंद भाटवडेकर, राजू अरूनाहली, सिनियर मॅनेजर सौरभ बासू, अंबरनाथ आयटीआयचे प्राचार्य अजित शिंदे, उपप्राचार्य महेश जाधव, जनसंपर्क अधिकारी नवीन भोपी, हेमंत बारगल, गटनिदेशक, निदेशक कार्यालयीन कर्मचारी हे सुद्धा उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!