ठाणे

अनधिकृत बांधकाम विरोधात आवाज उठवल्याने बिल्डर लॉबीकडून जीवास धोका, रोहिदास मुंडेंचे पोलीस आयुक्तांना पत्र

दिवा:-अनधिकृत बांधकाम विरोधात आवाज उठवल्याने दिव्यातील संबंधित लोकप्रतिनिधी व बिल्डर लॉबी कडून माझ्या जीवास धोका आहे असे पत्र भाजपचे रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिव्यातील अनधिकृत बांधकाम मुळे येथील सोयी सुविधा वर प्रचंड ताण येतो, शिवाय दिव्यात सध्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत अशात परिणामी मागील अनेक दिवसांपासून मी दिव्यातील अनधिकृत बांधकाम विरोधात आवाज उठवत असून यामुळे बिल्डर लॉबी व हितसंबंध असणारे लोकप्रतिनिधी यांची कोंडी झाली आहे.माझ्यामुळे त्यांना बांधकामे करण्यात अडचण निर्माण होत असल्याने त्यांच्याकडून माझ्या जीवास धोका निर्माण झाला आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास त्याला दिव्यातील बिल्डर लॉबी व त्यांची पाठराखण करणारे नगरसेवक जबाबदार असतील असे पत्र रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहे.

अनधिकृत बांधकाम वाढीस लागल्याने दिव्यात शहर बकाल होत चालले आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि अनधिकृत बांधकामे करणारे बिल्डर चोरीचे पाणी वापरून राजरोसपणे बांधकामे करत आहेत याविरोधात मी जागरूक नागरिक म्हणून आवाज उठवत असल्याने माझ्यावर अनधिकृत बांधकाम सम्राटांचा राग आहे ,परिणामी मला संरक्षण मिळावे अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!