ठाणे

मतदार यादीत फोटो नसल्याने डोंबिवलीत एक लाख मतदार मतदानापासून मुकणार

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली येथील  १४३ विधानसभा मतदार संघाची  मतदार यादीचे अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. परंतु  मतदार यादीत सुमारे १  लाख मतदारांचे फोटो नाहीत. मतदारांनी आपले फोटो समाविष्ट करून घेतले नाही,  तर येणाऱ्या निवडणुकीत त्या मतदारांना मतदान करण्यास मिळणार नाही अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी विवेक विचारे यांनी दिली. डोंबिवलीपश्चिम येथील भावे सभागृहात मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असून संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देतांना विचारे यांनी आपले मत स्पष्ट केले. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी गजेंद्र पाटोळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी अधिक माहिती देतांना विचारे म्हणाले, १४३ विधानसभा मतदार संघ यादी पाहता सद्यस्थितीत ३,७५,०८४ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार १,९३,३६८ आणि स्त्री मतदार १,८१,७१६ आहेत. एकूण यादी भाग ३०३ असून अपंग मतदार संख्या १९३ आहेत. सद्यस्थितीचा विचार करता झालेल्या पंचनाम्यानुसार १४,१९३ स्थलांतरित मतदार आहेत तर ९९४ मतदार मयत आहेत. असे असले तरी आजपर्यंत गेल्या पंधरा दिवसात फक्त १५ हजार मतदारांनी आपले फोटो मतदार यादीसाठी जमा केले आहेत. अद्याप 1 लाख मतदारांनी आपले फोटो मतदार यादीसाठी जमा केलेले नाहीत. यासाठी मतदार संघातील प्रभाग निहाय बैठका घेऊन प्रभागातील लोकप्रतिनिधींना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

ऑनलाईन पद्धतीने आपला फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी वेबसाईटचा अवलंब करावा असे आवाहनही विचारे यानी केले आहे. परंतु मात्र मतदारांनी आपले फोटो मतदार यादीत समाविष्ट केले नाही तर एक लाख मतदार मतदानापासून वंचित रहाणार आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!