ठाणे

उल्हासनगर मधील कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसाचा सत्कार

उल्हासनगर : उल्हासनगर शहरांमध्ये विसरलेली १ लाख ९  हजार रुपयांची रोख रक्कम व्यापाऱ्याला परत करणारे व कल्याण-डोंबिवली परिसरातून चोरीला गेलेल्या २ दुचाक्या जप्त केल्या प्रकरणी उल्हासनगरातील वाहतूक शाखेचे पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण  यांचा सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

काही दिवसापूर्वी निरंजन ब्रिजलानी हे प्रवासादरम्यान १ लाख ९ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग रिक्षात विसरले होते सदर बाब लक्षात येताच त्यांनी नेहरू चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना दिली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण  यांनी तात्काळ रिक्षाचालकांचा शोध सुरू केला रिक्षाचालक संतोष तूपसौदर्य यांचा शोध घेऊन रोकड असलेली बॅग व्यापारी निरंजन ब्रिजलानी यांना रीतसर परत करण्यात आले.

या त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड यांनी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण  यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम आदी उपस्थित होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!