ठाणे

कोपर पुलाबाबत पालिकेला ‘आश्वासनवाले प्रशासन` पुरस्कार द्या.. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांची टीका…

डोंबिवली ( शंकर जाधव ) : दोन वर्षापूर्वी डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर पूल पुनर्निर्माणासाठी बंद करण्यात आला होता.मात्र ठराविक कालावधीत पुलाचे काम पूर्ण झाले नाही.डोंबिवलीतील वाहनचालकांना होणाऱ्यात्रासावर मनसेने लक्ष देत शिवसेना- भाजप आणि पालिका प्रशासनावर सडकून टीका केली आहे.

मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील म्हणाले,केडीएमसील ‘आश्वासनवाले प्रशासन’ असा एक पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही.मी स्वतः १६ जूनला म्हणजे बरोबर एक महिना आधी जाऊन कोपर पुलाची पाहणी केली होती.कधी करोनाचे कधी पावसाचे कारण दाखवत लोकांची गैरसोय अजून किती वाढवून ठेवणार आहात? सहा महिन्यात हा पूल आधी पूर्ण करू, मग आश्वासन दिले कि पावसाआधी पूर्ण करू, मग जुलैपर्यंत पूर्ण करू, दोन वर्ष उलटून गेले तरी आश्वासनांचेच पूल बनत आहेत. खऱ्या कोपर पुलाचं काय ? सनी देओलच्या चित्रपटातल्या त्या संवादासारखी अवस्था झाली आहे. 

कल्याण डोंबिवलीतील नागरिकांची….`तारीख पे तारीख तारीख पे तारीख`. तुमच्याकडे उपाय नसेल तर सांगा आम्ही पर्याय सांगतो. शोधून आणतो आमचा आम्हीच हरवलेला कोपर पूलअश्या शब्दात आमदार पाटील यांनी टीका केली.तर नसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत म्हणाले,डोंबिवलीकरांनी किती सहनकरायचे याला काही मर्यादा आहेत कि नाही ? सत्ताधारी आणि आता पालिका प्रशासन यांनी  डोंबिवलीकरांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!