क्रिडा

भारतीय स्केटिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी पि. के. सिंग यांची निवड

 ठाणे : भारतीय स्केटिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी मुंबईचे पिके सिंग यांची उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

नवी दिल्ली येथे झालेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणी सभासदांची निवड माजी न्यायाधीश  मुलचंद गर्गयांनी जाहीर केली.१९५५ नंतर प्रथमच रोलर स्केटिंग फेडरेशन च्या पदाधिकारी मध्ये  महाराष्ष्ट्रा ला प्रतिनिधित्व मिळाले आहे. पुष्पेंद्र कुमार सिंगस्केटिंग ह्या खेळातील आंतरराष्ट्रीय पंच तसेच स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे गेली पंधरा वर्ष अध्यक्ष आहेत.

 स्केटिंग हा खेळ महाराष्ट्रात  वाढविण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.. श्री सिंग ह्यांनी १९८७ मध्ये रोलर स्केटिंग प्रशिक्षक म्हणून ह्या खेळात पदार्पण केले. त्यांनी एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स & इकोनोमिक्स , मुंबई येथे डायरेक्टर म्हणून २५ वर्षे कार्य केले तेथून ते रिटायर्ड झाले आहेत त्याच बरोबर त्यांनी अनेक रोलर स्केटिंग चे राष्ट्रीय आणि अंतर  राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू निर्माण केले आहेत . त्यांनी रोलर स्केटिंग खेळामध्ये केलेले कार्य खालील प्रमाणे २०१० जागतिक रोलर स्केटिंग स्पर्धा कोलंबिया – प्रशिक्षकमहाराष्ट्र रोलर स्केटिंग असो –  १९९२ पासून जॉईंट सेक्रेटरी आणि जनरल सेक्रेटरी तसेच सध्या प्रेसिडेंट ( तिसरी टर्म ) म्हणून कार्यरत आहेतरोलर स्केटिंग फेडरेशन राष्ट्रीय स्पर्धा चेयरमन म्हणून अनेक स्पर्धांमध्ये काम.२००५ साली च्या जागतिक रोलर स्केटिंग स्पर्धे मध्ये ओफिशियल म्हणून काम.तसेच अनेक युनिवर्सिटी राष्ट्रीय स्पर्धा, आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धा मध्ये ओफिशियल म्हणून काम केले आहे..
नवनिर्वाचित पदाधिकारी
श्री तुलसीराम अगरवाल – अध्यक्षश्री  नरेश कुमार शर्मा – सचिव श्री बगीरथ दधीच – कोषाध्यक्षश्री रेजी अब्राहम –  उपाध्यक्ष श्री जी एस खुर्मी – उपाध्यक्षश्री सेबॅस्टियन प्रेम उपाध्यक्षश्री पुष्पेंद्र कुमार सिंग – उपाध्यक्ष (महाराष्ट्र)श्री बलविंदरजीत  सिंग  – उपाध्यक्षश्री किशोर भंडारी   – उपाध्यक्षश्रीमती सपना देसाई  –  सहाय्यक सचिव श्री जितेंद्र धिंग्रा – सहसचिवश्री डी के राठोर  – सहसचिवश्री रमेश नागदा  – सहसचिव श्री जी एस राव  – सहसचिवश्री मिलिंद देसाई  – सहसचिव

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!