ठाणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर-गरिबांसाठी मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप शिबिर

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 52 देवीचापाडा येथील शिवसेना उपशहर संघटक हरिश्चंद्र (बंडू) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक संदेश हरिश्चंद्र पाटील यांनी मोफत नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबीर देवीचापाडा येथील संपर्क कार्यालयात आयोजित केले होते.  

  शिबिराचे उदघाटन शिवसेना उपशहर संघटक हरिश्चंद्र (बंडू) पाटील, समाजसेवक संदेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख राजेंद्र सावंत, उपविभाग प्रमुख देवरे, उपविभाग प्रमुख कैलास सणस, उपविभाग अवि मानकर, महिला विभागप्रमुख सोनल सुर्वे, सहदेव शिर्के, दिलीप भावे, योगेश टेमगिरे, राजन म्हात्रे, तातूकुमार गावडे, हरिश्चंद्र चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिराचा  एक हजारहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

यावेळी संदेश पाटील म्हणाले, कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन आणि आता पुरपरिस्थितीमुळे नागरिकांना डोळ्यांच्या त्रासासाठी नेत्रतज्ञ डॉक्टरांकडे जाता येत नाही व चष्मेही घेता येत नाहीत. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबीर आयोजित केले. या शिबिरासाठी नोंदणी करण्यात आली होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!